मालेगांव तालुक्यातील दाभाडी गावाची थोडक्यात माहिती
दाभाडी गाव
__ पूर्व इतिहास__
सुमारे 1000 वर्षा पुर्वी म्हणजेच 10 व्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराणे राज्य करीत होते. मालेगाव व सभोवतालचा परिसर हा त्यांच्या राज्याचा एक भाग होता. ताम्रपटात लिहिलेल्या वर्णनावरून गिरीपर्णा(गिरणा) व मोक्षणी(मोसम) या नद्यांचा परीसर हा अत्यंत समृद्ध होता. एका उत्सव प्रसंगी राष्ट्रकूट घराण्यातील दन्तिदूर्ग राजाने माहुलीग्राम(मालेगाव), निलग्राम(निळगव्हाण), वटनेर(वडनेर) पिंपलवद्ध(पिंपळगाव) इ. नऊ गावांचा वसुल धरमकार्यासाठी जैन श्रावक संघास दान दिल्याचा तपशील या ताम्रपटात आढळून येतो. या वरुन ह्या भागाची सुपिकता व समृद्धी लक्षात येते.
याच काळात माहुलीग्राम(मालेगाव) पासून पश्चिमेला 6कि मी अंतरावर गिरणा नदीच्या काठावर भाजीपाला,
लसुण इ. पिकविणाऱ्या माळी लोकांची लहानशी वस्ती होती. त्या वस्तीत त्यांनी हनुमानाचे एक देवालाय बांधले. देवाजवळची वस्ती म्हणून या वस्तीला देववाडी नावाने ओळखु लागले.
रोकडोबा नाव का पडले?
देववाडीच्या हनुमान मंदिराच्या ओट्यावर माहुलीग्रामचे(मालेगावचे) व्यापारी देववाडीच्या शेतकर्यांच्या विकलेल्या मालाची रोकड रक्कम चुकती करत. म्हणून सदर हनुमान देवालयाला लोक रोकडोबा असे संबोधु लागले. पुढे रोकडोबा हेच नाव कायम झाले.
11 व्या शतका नंतर मुसलमानांच्या पाच शाही राजवटीच्या स्वार्यामुळे मालेगाव परीसराचा र्हास होत गेला.
देववाडी वस्ती ही गिरणा काठावरच होती. महापुराच्या संकटात वस्तीतील लोकांचे जीवन धोक्यात येत गेले. महापुराचे भय व वसाहतीला अपुर्या पडणार्या जागेमुळे देववाडी त्या ठिकाणाहून उठून पुर्वेला 3 कि.मी. अंतरावर असलेल्या दोध्याड नदीच्या काठावर आली. गाव गेले परंतु देवाडीचे रोकडोबा हनुमान देवालाय आहे तेथेच राहीले.
पुढे 1761 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी या *देववाडीला आश्रय दिला. त्यांनी सरदार विंचुरकरांना देववाडीची जहागीर दिली. सरदार विचुंरकरांनी गावात धर्मशाळा, विटांचा महाल(बंगला) व पायर्याची विहीर बांधली. पायविहीरीत एक भुयारी मार्ग पण होता. तो भुयारीमार्ग हा थेट मालेगावच्या भुईकोट किल्ल्याशी जवळीक साधतो. त्यावरून मालेगावचा भुईकोट किल्ला व दाभाडीच्या पुराण वास्तु समकालीन असल्याची साक्ष मिळते.
आज दाभाडीत पुराण वास्तु अस्तित्वात नाहीत. भुयारी मार्ग व मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम सन, 1765 मध्ये झालेले आहे.
दाभाडी नाव का पडले?
पूर्वीच्या देववाडीला अहिराणी भाषेत दवाडी या नावाने उच्चारू लागले. तर मालेगावचे उर्दू भाषिक लोक दबाडी या नावाने उच्चारू लागले.
देवाडीचेदवाडी दवाडीचेदबाडी_ दबाडीचे_दाभाडी
असे दाभाडी हे नाव कायम झाले.
आज सुध्दा अहिराणी भाषेत काही लोक दाभाडीला दवाडी या नावाने उच्चारतात.
मुळवतनदार
दाभाडीचे मुळवतनदार हे जिरे व नवरे या आडनावाचे माळी लोक आहेत.
दाभाडीचे निकम
स्वराज्यात शिवकाळात यसाजी कंकं हा एक शुर सरदार होता. राजकीय दृष्ट्या पुढे त्यांचे वंशज चांदवडला स्थायिक झालेत. यसाजीकंकं ह्या मोडी भाषेतील नावातील जी चा उच्चार नि व क चा उच्चार हा म असा करू लागल्याने यसा निकम असे नाव वाचु लागले.
निकम हे मुळ चांदवडचे वतनदार…
त्या काळात निकम हे चांदवडहुन दाभाडीला आलेत….
सौजन्य- श्री.सुरेश कारभारी निकम
दाभाडी गाव हे गिरणा व दोधाडी नदीच्या काठावर बसलेले आहे. गावातील मूळ व्यवसाय हा शेती आहे गाव त्यावेळेचा गिरणा सहकारी साखर कारखाना व गाव तालुक्या जवळ असाल्यामुळे गावतील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होता.मात्र कालांतराने कारखाना बंद झाल्याने रोजगार प्रश्न निर्माण झाला.
2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन करण्यापूर्वी, दाभडी हा 1977 ते 2004 दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचा मतदारसंघ क्रमांक 74 होता. गावाची लोकसंख्या २०११ जनगणना नुसार १७८३२ एवढी आहे .गावाचे एकूण क्षेत्रफळ ३००९.५० हेक्टर एवढा आहे .
गावाची लोकसंख्या २०११ जनगणना नुसार १७८३२ एवढी आहे . गावाचे एकूण क्षेत्रफळ ३००९.५० हेक्टर एवढा आहे . बागायती ९२५.४० जिरती १४७५.८५ आहे.
शेती विषयक
दाभाडी गावात पारंपारिक तसेच आधुनिक शेती केली जाते
पारंपारिक शेती :- या मध्ये बाजरी .गहू.हरभरा .तूर.ज्वारी आणि कांद्याचे पिक घेतले जाते
आधुनिक शेती :- दाभाडी गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते त्यात डाळींब . अप्पला बोर .शेवगा. अंजीर विविध रंगाचे भाजीपाला पिके अशा विविध प्रकारच्या फळ बागांचे भरगोस उत्पन्न या गावात घेतले जाते
गावातील वार्ड माहिती.
गावातील वार्ड :- ०६
ग्राम पंचायत सदस्य माहिती
एकूण सदस्य सख्या :- १७
महिला सदस्य :- ९
पुरुष सदस्य :- ८
पिण्याच्या पाण्याचे स्रोत.
१२ गाव पाणी पुरवठा व वाढीव तळवाडे धरण योजनेतून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जातो जातो.